Dhule Crime News Saam Tv
क्राईम

Dhule Crime News : धुळ्यात रक्तरंजित थरार! महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या, परिसरात खळबळ

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील दिघावे गावाजवळ शेतकरी महिलेची लोखंडी सळईने निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी पळ काढला पण ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एक आरोपी पकडला गेला. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

धुळे जिल्ह्यातील दिघावे परिसरात शेतकरी महिलेची निर्घृण हत्या

सुनिता बच्छाव यांच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून हत्या

हल्लेखोरांनी पळ काढला, पण ग्रामस्थांच्या सतर्कतेने एकाला पकडलं

पोलिसांचा तपास सुरू

धुळ्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात शेतकरी महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एखाद्या चित्रपटातील गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर पळून जातात तसाच या हल्लेखोरांनी देखील पळ काढला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका हल्लेखोराला पकडण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुनिता बाबाजी बच्छाव (वर्षे ४०) असे आहे. त्या दिघावे ते पिसोळबारी रस्त्यालगतच्या शेतात पतीसोबत वास्तव्याला होत्या. काल बच्छाव यांच्या घराच्या मागे सुनीता यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सुनिता बाबाजी बच्छाव यांच्यावर हल्ला करून काही हल्लेखोर पळून जात होते. यादरम्यान काही ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी या हल्लेखोरांचा पाठलाग केला. ही धरपकड काही तासभर चालली मात्र अखेर ग्रामस्थांनी एका हल्लेखोराला पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅन मधून पळून जाताना पकडलं. आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.

मात्र या महिलेची नेमकी कोणत्या वादातून हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच हे हल्लेखोर कोण होते? ते सुनिता यांच्याकडे कोणत्या हेतूने आले होते याचा तपास पोलीस करत आहेत. ग्रामस्थांनी पकडून दिलेल्या संशयित हल्लेखोराची पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेने धुळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील निवासी डॉक्टरांकडून संप

Mobile Recharge: जिओ अन् एअरटेलपेक्षा खास प्लॅन, ३५० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० दिवसांसाठी दररोज डेटा

Shocking: बहिणीच्या दिराने पळवून नेलं, अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध; गरोदर पीडितेला रेल्वे स्टेशनवर सोडून पळाला

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

SCROLL FOR NEXT