Delhi Metro Seat Dispute 
क्राईम

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

Delhi Metro Murder Case : दिल्ली मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव सीटवरून झालेल्या वादानंतर ४८ वर्षीय पवन शर्मा यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निवृत्त आयएएस अधिकारी संजय प्रताप सिंह आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यांना अटक करण्यात आली.

Namdeo Kumbhar

Delhi Metro Seat Dispute : दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान सीटवर बसण्याच्या क्षुल्लक वादावरून ४८ वर्षाच्या व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत प्रचंड खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मेट्रोच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी आणि त्याच्या ३६ वर्षाच्या मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या मेट्रोमध्ये सीटवर बसण्यावरून दोन प्रवाशांमध्ये आधी शा‍ब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मेट्रोतील इतर प्रवाशांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाचे संजय प्रताप सिंग आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंग यांना या प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ८ ऑक्टोबर रोजी पीडित पवन शर्मा हे आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आई दुर्गा देवी यांच्यासोबत यमुना विहारच्या दिशेने मेट्रोने प्रवास करत होते. मंडी हाऊस स्टेशनवर संजय प्रताप सिंग आणि त्यांचे सुपुत्र मेट्रोमध्ये चढले. मेट्रोमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवर पवन शर्मा आणि त्यांची आई बसले होते. याच जागेवरून आधी बाचाबाची झाली आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

मारामारी आणि धक्काबुक्की सुरू असतानाच मेट्रो 'सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन'वर पोहोचली. त्यावेळी पवन शर्मा अचानक बेशुद्ध पडले. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मेट्रो पोलीस ठाण्याला मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्मा यांना त्यांच्या आईसोबत उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

भावाला भेटल्यानंतर शर्मा आईसोबत गुडगावहून घराकडे परत येत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. शर्मा यांच्या आई दुर्गा यांनी सांगितले की, मेट्रो सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी २ जण आले आणि त्यांनी आम्हाला उद्धटपणे जागा सोडायला सांगितली. आम्ही उठलो आणि मग मुलाने त्यांना सांगितले की ते आता सीटवर झोपू शकता. त्यातील वयस्कर व्यक्तीने कॉलर पकडली आणि त्याला कानशिलात लगावली. त्या माणसाच्या मुलानेही हल्ला केला. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीने माझा हात पकडला.

प्राथमिक चौकशीदरम्यान, पोलिसांनी शर्मा यांच्या आईचा जबाब नोंदवला. त्यांच्या जबाबाच्या आधारे, सदोष मनुष्यवध आणि समान उद्देशाने केलेल्या कृत्यांशी संबंधित बीएनएसच्या कलम १०५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT