Delhi Crime Saam Tv
क्राईम

Crime: स्विमिंग शिकण्यासाठी गेलेल्या २ अल्पवयीन मुलींसोबत भयंकर घडलं; डांबून ठेवत सामूहिक बलात्कार

Delhi Crime: दिल्लीमध्ये २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

Priya More

राजधानी दिल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील नरेला भागात ही घटना घडली. दोन्ही मुलींना आरोपींनी एका खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, माझी ९ वर्षांची मुलगी नरेला येथे एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जात होती. ५ ऑगस्टला ती नेहमीप्रमाणे स्विमिंग करण्यासाठी गेली. त्याठिकाणी आरोपी अनिल आधीच उपस्थित होता. अनिल माझ्या मुलीला एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी आणखी एक १२ वर्षांची मुलगी होती. ती मुलगी देखील याठिकाणी स्विमिंग शिकण्यासाठी येत होती. आरोपीने दोन्ही मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याठिकाणी दुसरा आरोपी मुनील आला. त्याने देखील दोन्ही मुलींवर बलात्कार केला.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी दोन्ही मुलींना घटनेबाबत कुणाला सांगितले तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी धमकी दिल्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत कुटुंबीयांना देखील काहीच सांगितले नाही. ९ वर्षांची पीडित मुलगी स्विमिंगसाठी जायला नकार देत होती. तिची आई तिला सतत स्विमिंगला जा असे सांगत होती पण ती जायला नाही बोलत होती. त्यामुळे तिच्या आईने तिची विचारपूस केली असता रडत रडत मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांना फोन करून घरी बोलावून घेतलं.

पोलिसांनी दोन्ही मुलींची वैद्यकिय तपासणी केली असता त्यांच्यावर गँगरेप झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गँगरेप, धमकी देणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी तसंच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे वय ३७ आणि २४ वर्षे आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींनी आणखी कोणत्या मुलींसोबत असं कृत्य केले की नाही याचा देखील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेता अन् तरुणी बेडवर नको त्या अवस्थेत, अश्लील व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; परप्रांतीयांची 2 किमीची रांग, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या पुलावरून कालव्यात कार कोसळली, अपघातात तिघे गंभीर जखमी

Monday Horoscope: कामाच्या नव्या संधी मिळतील, ५ राशींचे प्रेमसंबंध सुधारणार; वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

SCROLL FOR NEXT