Crime News Saam Tv
क्राईम

Woman killed in Delhi : दिल्लीतील तरुणीच्या हत्येचा उलगडा, मुंबईतून अटक, धक्कादायक कारण आलं समोर

Woman killed in Delhi Crime Update: दिल्लीतील फर्श बाजार परिसरात २३ वर्षीय तरुणीच्या झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Crime News Update:

दिल्लीतील फर्श बाजार परिसरात २३ वर्षीय तरुणीच्या झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या घरातील बॅगेत रविवारी तरुणीचा मृतदेह आढळला होता. घटनेनंतर तिचा होणारा नवरा फरार होता. संशय बळावल्याने पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर त्याला मुंबईत पकडलं.

पोलिसांनी आरोपी सुलतानला (वय १९) अटक केली आहे. आरोपीचा डिलिव्हरी आणि पॅकेजिंगचा व्यवसाय होता. शमा असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव होतं. ती परपुरुषांशी बोलायची म्हणून सुलतान चिडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडितेच्या कुटुंबियांची सुलतानने दिशाभूल केली होती. तरुणी बेपत्ता असून तिला शोधण्याचा प्रयत्न करेन, तसेच ती हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईल, अशी बतावणी त्याने तिच्या कुटुंबीयांकडे केली होती.

रविवारी संध्याकाळी, विश्वास नगर येथील घरात संशयास्पद बॅग आढळल्याची माहिती मिळाली. त्या बॅगेत तरुणीचा मृतदेह होता. तिच्या डोक्यावर आणि मानेवर जखमा होत्या. यावरुन तिची गळा दाबून हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना होता.

शनिवारी सुलतानच्या घरात हत्या झाली होती. सुलतानकडे काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही बॅग दिसली. त्याला संशय आला. त्याने पोलिसांना कळवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा फोन बंद येत होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी मुंबईत मुलुंडमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर डीसीपी राजीव रावल यांच्या नेतृत्वाखाली अनेक पथके मुंबईत पोहोचली. सोमवारी आरोपीला अटक केली, असे डीसीपी रोहित मीना यांनी सांगितले.

पोलिसांनी सुलतानची चौकशी केली. तो शमाला दोन-तीन वर्षांपासून ओळखत होता. त्यांनी लग्न करण्याचा विचार केला होता. गेल्या शनिवारी लग्न ठरवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी शमाच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती, असं सुलतानने सांगितले.

त्याच दिवशी सुलतानने शमाला आपल्या घरी बोलावले. ती इतर पुरुषांशी बोलत असल्यामुळे तो चिडला होता. संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुलतानने तिची गळा आवळून हत्या केली, असेही पोलिसांनी सांगितले.

सुलतानने तिचा मृतदेह एका बॅगेत भरला. ऑफिसला कुलूप लावले आणि फोन बंद करुन दिल्लीहून ट्रेन पकडून मुंबई गाठली. तो मुंबईत त्याच्या चुलत भावाकडे आला. नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला असे त्याने त्याच्या भावाला सांगितले.

पोलिसांनी सुलतानची चौकशी केली. सुलतानवर संशय येऊ नये सासाठी सुलतानच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रार नोंदवली होती असे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेने शमाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शमाच्या भावाने सांगितले की, आम्ही शमाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु तिच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर आम्ही सुलतानशी संपर्क साधला. तो म्हणाला की, तो पोलिसांत शमा हरवल्याची तक्रार करेन. पण सुलतानशीही त्यानंतर काहीच संपर्क झाला नाही. अखेर शमाच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT