Father in law murder saam tv
क्राईम

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Father in law murder: बिहारमध्ये कौटुंबिक वादातून सूनाने सासऱ्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बिहारमध्ये एक क्रूर आणि धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा उभा राहणार आहे. यामध्ये एका सुनेने तिच्या सासऱ्यांच्या गुप्तांगार वार केले आणि त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

महिलेने केली सासऱ्यांची हत्या

या महिलेने तिच्या सासऱ्यांनी निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने तिने घर सोडलं होतं. मात्र यावेळी तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ सासरे करत होते. मुख्य म्हणजे या महिलेचे सासरे अपंग होते मात्र तरीही ते मुलांची आणि घराची जबाबदारी सांभाळत होते.

सासऱ्यांना असं वाटत होतं की, मुलं आईपेक्षा जास्त त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. त्यामुळे काहीही केल्या ते मुलांना आईकडे पाठवण्यास तयार नव्हते. मात्र एक दिवस महिला घरी आली आणि मुलांना बळजबरी सोबत घेऊन जात होती. यावेळी सासऱ्यांनी ठाम विरोध केला.

दरम्यान याच मुद्द्यावरून सून आणि सासरे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. सुरुवातीला हा वाद साधा वाटत होता. मात्र काही वेळाने त्यांचं कडाक्याचं भांडण झालं.

सासऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टवर केला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात सूनेने बाजूला पडलेली वीट उचलली आणि सासऱ्यांवर हल्ला केला. यावेळी तिने सासऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टवरही वारंवार प्रहार केले. सासऱ्यांना अपंगत्व असल्याने ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. त्यामुळे गंभीर दुखापत आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर आजूबाजूते लोकं घटनास्थळी दाखल आहे. मात्र तोपर्यंत सासऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेनंतर आरोपी महिला घटनास्थळारून फरार झाली होती.

पोलिसांनी केली महिलेला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. आजूबाजूच्या परिसरात आरोपी महिलेची शोधाशोध केली आणि पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत सूनेने रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याचं सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT