Crime News  Yandex
क्राईम

Crime News: अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं सूनेच्या बॉयफ्रेंडनं सासूला संपवलं; ८०० CCTV बघितल्यानंतर धक्कादायक फुटेज समोर

Rajasthan Crime News: प्रेमामध्ये आडथळा ठरणाऱ्या सासुला तिच्याच सुनेने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपुर येथे उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jodhpur Crime News

प्रेमामध्ये आडथळा ठरणाऱ्या सासुला तिच्याच सुनेने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील (Rajasthan)जोधपुर येथे उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल ८०० सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हत्येचा तपास करण्यात यश आले आहे. सध्या या हत्येच्या बातमीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपुकमधील बोरानाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. जिथे (ता.७)मार्च रोजी पीडित महिला संतोष कंवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपीने सासूचा गळा दाबून तब्बल ५ वेळा गळ्यावर वार केले. या संदर्भात पीडित महिलेच्या मोठ्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात परिसरातील साधारण ८०० सीसीटीव्ही(Cctv) फुटेज तपासले. तेव्हा जाऊन या धक्कादायक हत्येचा खुलासा करण्यात आला.यानंतर पोलिसांनी तात्काळ या हत्येतील आरोपींनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन मुलं होती,ज्यामधील लहान मुलगा गोविंग सिंह कंस्ट्रक्शनचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी गोविंद कंस्ट्रक्शन साईटवर काम करताना त्याला दुखापत झाली होती तेव्हा पासून तो आजारी असायचा. लहान मुलाची बायको आरोपी मोना कंवर(वय.३२) एक सीड कंपनीत काम करत होती.

जिथे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपी राहूल जांगिडं(वय.३२)च्या प्रेमात पडली. याचं मैत्रीचे रुपांतर पुढे जाऊन प्रेमात झाले. त्यानंतर राहुल आणि मोना वारंवार भेटत असत. त्यातच पीडित सासुने तिच्या सूनेला आणि आरोपी राहुला एकदा पाहिले होते,त्यानंतर आरोपी महिला मोनाने आपल्या सासुच्या हत्येचा कट रचण्याची योजना बनवली.

निर्घृण हत्या...

मोनाचे आणि राहूल नात्यात आल्यापासुन मोना जास्तीत जास्त तिच्या बुर्ज कला गावी राहत होती. जिथे ती राहुलला भेटत असतं. हत्येच्या दिवशी मोना राहुलला तिच्या सासरी बोलावले मात्र ती स्वत हा सासरी गेली नाही. दरम्यान राहुल मोनाच्या सासरी पोहचल्यावर पीडित महिला संतोष यांनी राहुलला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र राहुलने मोनाच्या सासूचा गळा दाबून गळ्यावर पाच वेळा वार केले आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून एका कपड्याने तिचे तोंड दाबले. हत्येच्या आधी राहूलने घरात असणाऱ्या गोविंदच्या ५ वर्षीय मुलाला चॉकलेट घेण्यासाठी घराच्या बाहेर पाठवले.

पोलीस तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या फुटेजच्या आधारे आरोपींनी दोंघाची चौकशी केली असता आरोपींनीच सर्व हत्येची घटना पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी आरोपी राहुला अटक केली असून अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा; ₹२००० आले की नाही?

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Maval : मावळच्या तिन्ही नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची सोडत; वडगाव नगराध्यक्ष महिला राखीव

Tudtuda Disease: भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगानं भातपीक फस्त....भातपीक नष्ट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त...|VIDEO

Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, पाहा EXCLUSIVE VIDEO

SCROLL FOR NEXT