Cyber Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Cyber Crime: गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्यालाच घातला गंडा; डेबिट कार्डचं पिन सेट करण्याच्या नादात गमावले ४.४९ लाख रुपये

cyber crime: बँकेतून बोलत असल्याचं सांगत सायबर गुन्हेगाराने अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ४.४९ लाख रुपये लाटले.

Bharat Jadhav

Mumbai Cyber Crime:

दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढू लागले आहेत. सायबर गुन्हेगार लोकांना स्कॅम मेसेज पाठवून गंडा घालत असतात. आता मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यालाच सायबर गुन्हेगारांनी गंडा घातलाय. बँकेतून बोलत असल्याचं सांगत सायबर गुन्हेगाराने अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ४.४९ लाख रुपये लाटले. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यानं सायबर क्राईम पोर्टलवर आणि काळा चौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याची ४.४९ लाख रुपयांची फसवणूक झालीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलीस ठाण्यात तैनात आहेत. गेल्या आठवड्यात ११ नोव्हेंबरला त्यांना डेबिट कार्ड मिळाले. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून मोबाईलवर फोन आला. मी तुमच्या बँकेतून बोलत आहे. तुमचे डेबिट कार्ड आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्डचे पिन सेटअप करून देण्यासाठी फोन केल्याचं सांगत आरोपीने मोबाईल क्रमांकावर एक फाइल पाठवली. अधिकाऱ्यानं त्या फाईलवर क्लिक केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर पॅनकार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक आदीची माहिती टाकायला लावली. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती मागितली. तेव्हा पोलीस अधिकाऱ्याला संशय आला. बँक खात्याची माहितीचं काय करायचं आहे, असा प्रश्न अधिकाऱ्यानं केला त्यानंतर समोरील व्यक्तीने कॉल बंद केला. परंतु उशीर झाला होता कारण अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून १.९७ लाख , १९५० रुपये, ५७ हजार असे एकूण ४.४९ पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT