Pradeep Sharma News: माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा पुन्हा राजकारणात सक्रिय, मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Mumbai ex-cop Pradeep Sharma: प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Pradeep Sharma News:
Pradeep Sharma News:Saam tv
Published On

संजय गडदे

Pradeep Sharma News:

वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. शर्मा यांनी आज शनिवारी अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात जनता दरबार भरवून अंधेरीकरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. या कामानंतर प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आज शनिवारीमुंबईच्या अंधेरीतील कार्यालयात जनता दरबार भरवला. या कार्यालयात अंधेरीतील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी या अंधेरीकरांनी प्रदीप शर्मा यांना पाणी,गटार सफाई यांसारख्या समस्या सांगितल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pradeep Sharma News:
Uddhav Thackeray in Mumbra: सत्तेच्या माजावर शाखा पाडली,घरंही पाडतील; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अंधेरीकरांनी जनता दरबारात तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात अडकत चालल्याचीही समस्या मांडली. यावरही मार्ग काढावा, असं निवेदन या अंधेरीकरांनी शर्मा यांना दिलं. यानंतर शर्मा यांनी झोन १० डीसीपी दत्ता नलावडे यांची भेट घेऊन ड्रग्ज माफियांची यादी बनवून सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येवर कायमचा तोडगा काढणार असल्याचे देखील प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे.

अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्येही अशीच चर्चा सुरु आहे.

Pradeep Sharma News:
Uddhav Thackeray In Mumbra : हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि..' उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान

प्रदीप शर्मा या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. प्रदीप शर्मा यांनी आधी 2019 मध्ये शिवसेनेकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com