Uttar Pradesh News Saam Tv
क्राईम

Shocking : सोशल मीडियावरची ओळख पडली महागात, लग्नाच्या भूलथापांना पडली बळी, ६ महिने सतत लैंगिक अत्याचार

Uttar Pradesh : लखनौमध्ये एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीसोबत सोशल मीडियावर मैत्री वाढवत तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिचे ६ महिने लैंगिक शोषण करून तिला गर्भात करण्यास धमकावले आहे. या घटनेने शहर हादरलं आहे.

Alisha Khedekar

  • लखनऊत दोन महिलांच्या तक्रारीनंतर लैंगिक शोषण व गर्भपाताचे दोन गुन्हे दाखल.

  • इंस्टाग्राम व सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे रूपांतर गुन्ह्यात.

  • एका महिलेनं लग्नाचे आमिष दाखवून शोषणाचा, तर दुसरीने तीन वर्षांच्या अत्याचारांचा आरोप केला.

  • पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला असून समाजात संतापाची लाट.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लखनऊमधील फैजुल्लागंज परिसरात सोशलमिडीयाच्या माध्यमातून मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतक्यावर न थांबता आरोपीने जबरदस्तीने गर्भपात करण्यास सांगून तिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

फैजुल्लागंज परिसरातील २१ वर्षीय तरुणीने लखीमपूर खेरी येथील महेंद्र वर्मा याच्याविरुद्ध धक्कादायक आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, आरोपी वर्माने इंस्टाग्रामवरून तिच्याशी मैत्री केली. काही महिन्यांतच त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी ते जून २०२५ दरम्यान वर्माने अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले. या काळात ती गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिला वैद्यकीय गर्भपात करण्यास भाग पाडले.

पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने आरोपीला लग्न करण्यासाठी दबाव आणला, तेव्हा त्याने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला पोलिसांनी प्रकरणाची नोंद न घेतल्याने पीडितेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी अखेर एफआयआर नोंदवला.

दुसऱ्या प्रकरणात, गुडांबा परिसरातील ३० वर्षीय महिलेनं राजाजीपुरम येथील रितिक गुलाटी आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिला गेल्या तीन वर्षांपासून गुलाटी आणि त्याच्या कुटुंबाकडून लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले. या काळात तिला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे ती सांगते. या नात्याचा शेवट लग्नात होईल, या अपेक्षेने पीडिता दीर्घकाळ गप्प राहिली होती. तिचे गुलाटीशी लग्न जानेवारी महिन्यात ठरले होते आणि नोव्हेंबरमध्ये होणार होते. मात्र, ऑगस्टमध्ये गुलाटीच्या कुटुंबाने अचानक लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि तिला व तिच्या कुटुंबाला धमक्या दिल्या. या आरोपांनंतर पोलिसांनी गुलाटीसह त्याचे वडील, आई आणि काकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दोन्ही घटनांची माहिती मिळताच सहपोलिस आयुक्त अमिता वर्मा यांनी सांगितले की, दोन्ही पीडित महिलांचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवले जातील. तसेच सर्व पुरावे गोळा करून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या मते, या तक्रारी गांभीर्याने घेण्यात येत असून तपासाची प्रत्येक पायरी काळजीपूर्वक पार पाडली जाईल.

समाजातील वाढत्या सायबर संपर्कामुळे सोशल मीडियावरून ओळख होऊन अनेक वेळा अशा घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. महिलांनी अशा प्रकरणांमध्ये वेळेत धाडस दाखवून तक्रार करणे आवश्यक असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. या दोन्ही घटनांमुळे कायदा अंमलबजावणी यंत्रणांसमोर पीडितांना न्याय देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आरोपींविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयात मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Maharashtra Live News Update : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?

Banjara ST Category Demand: बंजारा समाजाच्या मागणीवरून वातावरण तापलं, नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा महामोर्चा, VIDEO

EPFO News : निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात! किमान पेन्शन २५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता, कुणाला मिळणार फायदा?

SCROLL FOR NEXT