Mumbai Crime  saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: धक्कादायक! मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत ३८ वर्षीय व्यक्तीनं संपवलं जीवन

Ghatkopar News: घाटकोपरमधील एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून एका व्यक्तीने आत्महत्या केलीय. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

Bharat Jadhav

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुंबईमधील घाटकोपरमधील आरसिटी मॉलमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. आरसिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका ३५ वर्षीय व्यक्तीन आत्महत्या केलीय. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिपक जोशी आहे. पार्कसाईट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत याप्रकणाचा पुढील तपास सुरू केलाय. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिपक जोशी हे काही दिवसांपासून मानसीक तणावात होते. त्याच तणावाखाली त्यांनी आरसिटी मॉलवरून उडी मारत आत्महत्या केलीय.

आज दुपारी दिपक जोशी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं आरसिटी मॉलमध्ये आले. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर दिपक जोशी यांनी खाली उडी मारत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करत याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. पोलिसांनी केलेल्या प्रथम तपासानुसार दिपक जोशी हे मानसिक तणावात होते.

दरम्यान जोशी यांनी टोकाचं पाऊल अजून कोणत्या कारणाने उचललं त्याचे दुसरे काही कारण आहे का, कोणत्या कारणामुळे ते मानसिक तणावाखाली होते याचा पोलीस तपास करत आहेत.

सावकारी जाचाला कंटाळला व्यापाऱ्याची आत्महत्या

बीडमध्ये एका व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. कर्ज फेडूनही सावकाराला व्यापाऱ्याकडून अधिकचे पैसे हवे होते, त्यासाठी व्यापारी व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत होता. या नेहमीच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने आत्महत्या केली. गळफास घेण्याआधी व्यापाऱ्याने बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना एक पत्र लिहिलंय. त्यात त्याने आत्महत्येचं कारण सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी या व्यापाऱ्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याची सहा पटीने फेड देखील केली होती. सावकाराचा डोळा व्यापाऱ्याच्या शेतजमिनीवर होता, त्यामुळे तो व्यापाऱ्याकडे अधिक पैशांची मागणी करत होता. 'आणखीन पैसे दे अन्यथा तुला चटके देऊन मारू', अशी धमकी या व्यापाऱ्याला देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT