Pune Five Killing Case In 48 Hours saam Tv
क्राईम

Pune Crime: पुण्याचं मिर्झापूर होतंय? 48 तासांत 5 हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

Pune Five Killing Case In 48 Hours: पुणे शहरातला गुन्ह्यांचा चढता आलेख चिंता वाढवणारा आहे. दोन दिवसात 5 हत्येच्या घटना घडल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

सुसंस्कृत पुणे अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हांचा चढता आलेख चिंता वाढवणारा आहे. कारण कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: तीन-तेरा वाजलेत. पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. कारण पुण्यात 48 तासांत तब्बल 5 खुनाच्या घटना घडल्यात. शहरातील गजबजलेल्या कोंढवा, वानवडी, सिंहगड आणि वाघोली परिसरात या घटना घडल्या आहेत. सातत्याने घडणाऱ्या हत्येच्या घटनेने पुणेकर भयभीत झाले आहेत. पुण्यात नेमकं चाललंय काय? इथं पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित होतोय.

पुण्यात खुनाच्या घटना कुठे घडल्यायेत ते पाहूयात.

1) सिंहगड रोड

नऱ्हे परिसरात पेट्रोल चोरीच्या संशयावरून

चौघांकडून 20 वर्षीय तरुणाची हत्या

2) सिंहगड रोड

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून

3 अल्पवयीन तरुणांकडून एकाची हत्या

3) वाघोली

वडिलांना टकल्या म्हटल्यावरुन वाघोली-लोहगाव मार्गावर एकाची दगडानं ठेचून हत्या

4) वानवडी

कॉलेजला चाललेल्या अल्पवयीन तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्यानं वार करुन हत्या

5) कोंढवा

मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून

या घटनांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे तर उडालेच आहेत. मात्र पुणेकरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय. विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुद मिरवणाऱ्या पुण्याची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख बनतेय. ड्रग्ज तस्करी ते कोयता गँगच्या उच्छादानं शहराचं सामाजिक स्वास्थ बिघडलंय. गुन्हे आणि गुन्हेगारांची संख्या कमी होत नाहीये. फडणवीस सरकारच्या काळात तरी पुण्यातील गुन्हेगारी कमी होणार का हे पहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT