Uttar Pradesh News Saam Tv
क्राईम

Stop Dowry Deaths : आधी हल्ला केला, नंतर शेतात नेऊन पेटवलं, गरोदर महिलेसोबत सासरच्या मंडळीचं हादरवणारं कृत्य

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेची हुंडा न दिल्याने पतीसह सासरच्यांनी निर्दयी हत्या केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

Alisha Khedekar

  • मैनपुरीत २१ वर्षीय गर्भवती रजनी कुमारीचा हुंडा न दिल्याने हत्या करण्यात आली आहे.

  • पती आणि सासरच्यांनी मिळून तिची निर्घृण हत्या तिला जाळले आहे.

  • पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा हुंडा प्रथेविरोधात संताप निर्माण झाला आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने एका २१ वर्षीय गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कदायक म्हणजे ५ लाख रुपयांचा हुंडा देण्यास महिलेने नकार दिल्याने तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मिळून तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासकार्य हाती घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळपूर गावातील रजनी कुमारी हिचा विवाह एप्रिलमध्ये सचिन नावाच्या तरुणाशी झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांतच रजनीवर तिच्या सासरच्या लोकांकडून वाढता दबाव येऊ लागला. तिचा पती सचिन, त्याचे भाऊ प्रांशु आणि नातेवाईक रामनाथ, दिव्या आणि टीना यांनी तिच्याकडे ५ लाख रुपयांचा हुंडा मागितला. जेव्हा रजनीने नकार दिला तेव्हा तिला सतत मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला.

शुक्रवारी रात्री हा वाद इतका वाढला की रजनीच्या सासरच्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी तिला शेतात जाळले. तथापि, रजनीची आई सुनीता देवी यांना हे कळताच त्यांनी ताबडतोब ओंचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राहुल मिथास म्हणाले की, सचिन, प्राणशु, सहबाग, रामनाथ, दिव्या आणि टीना या सहाही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके जागोजागी छापे टाकत आहेत. लवकरच हे सगळे तुरुंगात असतील अशी ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समाजातील हुंडा बळीला कायमचा ब्रेक लागेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. एका गर्भवती महिलेला तिच्या पालकांच्या घरून पैसे न आणल्यामुळे तिचा जीव गमवावा लागला. ही घटना थरकाप उडवणारी आहे. हुंडा व्यवस्था अजूनही किती घातक आहे याचे हे एक वेदनादायक उदाहरण रजनीच्या हत्येतून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Expressway: बदलापूरला मिळणार नवा महामार्ग, ६०० किमीचा प्रवास एका झटक्यात होणार

Shivali Parab Photos : "तुझ्या डोळ्यांच्या सागरात...", शिवालीचं हटके फोटोशूट पाहून चाहत्यांचे भान हरपले

पायांना सतत मुंग्या, क्रॅम्प येतात? 'ही' कॅन्सरची लक्षणे तर नाहीत ना? दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात, ब्रेक फेल झाल्याने ट्रकला अपघात

लग्नसराईत सोनं - चांदीला चकाकी, २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT