Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: अकोला हदरलं! अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय तरुणाकडून अत्याचार

Akola Crime News: अकोल्यात २५ वर्षीय तरुणाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Bharat Jadhav

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रात्री २ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर अत्याचार झाला. या घटनेने अकोला जिल्हा हादरलाय. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय. अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्याचा शोध पोलिसांकडू घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिची मैत्रिण रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. त्यावेळी नराधमाने तिला दुचाकीवरून नेलं. नराधमने मुलीने अकोट फैल भागात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर परत पीडितेला रेल्वे स्टेशन चौकात सोडलं. दरम्यान या घटनेवरून महिले सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

रात्री दोन वाजता दोघी अल्पवयीन मैत्रिणी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. याचवेळी एका २५ वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून तिला अकोट फैल भागात नेलं. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. पीडिता तिच्या मैत्रिणीकडे आली होती. अकोला रेल्वे स्थानक चौकात ती उभी होती. त्यावेळी नराधमाने तिला दुचाकीवर बसून अकोट फैल भागात नेलं. तेथे तिच्यावर अत्याचार केला . त्यामुळे स्टेशन चौकात गस्तीवर असणारे पोलीस काय करत होते? हाच प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT