Kolhapur 5 Years Old Girl Rape Case News  Saam Tv
क्राईम

Shocking : कोल्हापूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २५ वर्षाच्या तरूणाला अटक

Kolhapur 5 Years Old Girl Rape Case News : कोल्हापूर शहरात पाच वर्षीय मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

  • पोलिसांकडून आरोपीला तातडीने अटक

  • घटनेनंतर शहरात संताप आणि पालकांमध्ये भीती

  • कठोर कारवाईची मागणी

रणजित माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur 5 Years Old Girl Physically Abuse Case News कोल्हापूर शहरात पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बांधकामाच्या साईटवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याप्रकरणी विशाल राजू वडर (वय २५ ) याला राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने अटक केली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात राजारामपुरी पोलीस हद्दीत एका बांधकामाच्या साईटवर ५ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीच्या वागण्या बोलण्यात कुटुंबियांना फरक जाणवू लागला. काल सकाळी चिमुरडी अस्वस्थ दिसत होती.

तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ संशयिताचा शोध घेतला. संतप्त झालेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT