Kalyan and Ulhasnagar Police Saam TV
क्राईम

Kalyan and Ulhasnagar Police: कल्याणसह उल्हासनगर पोलिसांची दमदार कामगिरी; वर्षभरात चोरीला गेलेला ३ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

Crime News: संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी २०२३ मध्ये २१ गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करुन ४९ आरोपीना अटक करण्यात आली. २०२२ मध्ये २२ गुन्हयात अशा प्रकारची कारवाई करुन ८१ आरोपींना अटक केली होती.

Abhishek Deshmukh

Kalyan Police:

कल्याण आणि उल्हासनगर पोलीसांनी या वर्षी ७६ टक्के गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साल २०२३ मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले असून ७६ टक्के झाल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिलीये. गेल्या वर्षी २०२२ मध्ये हेच प्रमाण ७६ टक्के होते. त्यामुळे कल्याण व उल्हासनगर परिमंडळमध्ये सराईत गुन्हेगाराविरोधात मोक्का, तडीपारअंतर्गत कारवाई केल्याने वाढत्या गुन्हेगारीचा वाढता आलेख थोपवण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून येतेय.

साल 2023 मधील गुन्हेगारी घडामोडींचा रिपोर्टअपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडला आहे. यामध्ये घरफोडी, चोरी, जबरी चोरी या गुन्हयात चोरीस गेलेले दागिने, रोख रक्कम, वाहने, मोबाईल असा १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४ रुपये किंमतीचा मुद्देमाल उल्हासनगर परिमंडळातील नागरीकांना परत करण्यात आला आहे.

तर कल्याण परिमंडळातील नागरीकांना २ कोटी ४ लाख ४८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश आले आहे.संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी २०२३ मध्ये २१ गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करुन ४९ आरोपीना अटक करण्यात आली. २०२२ मध्ये २२ गुन्हयात अशा प्रकारची कारवाई करुन ८१ आरोपींना अटक केली होती.

या माध्यमातून संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात आला आहे. २०२३ मध्ये वाहन चोरीचे ७२१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २९९ गुन्हे उघडकीस आले. २०२२ सालच्या तुलनेत वाहन चोरीच्या गुन्ह्यात ८४ गुन्ह्यांची घट झाली आहे. २०२३ मध्ये घरफोडीचे ३४६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १८७ गुन्हयांची उकल करण्यात आली. चैन स्न’चिंगचे ७५ गुन्हे घडले होते. त्यापैकी ६० गुन्हे उघड झाले आहेत. गुन्हे उघड येण्याचे प्रमाण ८० टक्के आहे.

या गुन्हयातील ७३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पोलिसांनी ३८ लाख ३६ हजार ९६ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चैन स्न्’चिंगच्या गुन्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत ५६ गुन्हयाची घट झाली आहे. महिलासंबंधित बलात्कार, विनयभंग, छळवणूक, अपहरण यासारखे १ हजार २०२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ९६ टक्के गुन्हे उघडीस आले आहेत.

महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दारु बंदीचे ५७५ गुन्हे २०२३ मध्ये दाखल झालेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. वर्षभरात ८ वेळा ऑल आऊट ओपरेशन राबिवले. २९ अवैध शस्त्रे हस्तगत करण्यात आली. १८४ फरार असलेले आणि २३२ पाहिजे असेलेल आरोपी चेक करण्यात आले. अवैध दारुच्या १८३, अवैध जुगाराच्या ४७ केसेस करण्यात आल्या. अंमली पदार्थ सेवन केलेल्या १२३ केसेस केल्या.

नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करनाऱ्या १ हजार ६३७ चालकांच्या विरोधात केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून १४ लाख ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT