crime x
क्राईम

Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला गळा चिरुन संपवलं, मृतदेह शेणात लपवला अन्...

UP News : चारित्र्यावर संशय घेत, रागाच्या भरात एका व्यक्तीने त्याच्या बायकोची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घराच्या बाहेर शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला. पोलिसांच्या हुशारीमुळे हे प्रकरण समोर आले.

Yash Shirke

चारित्र्याच्या संशयावरुन एका नवऱ्याने त्याच्या बायकोची निर्घृण हत्या केली. हत्या झाल्याचे लपवण्यासाठी त्याने बायकोचा मृतदेह घराजवळील शेणाच्या ढिगाऱ्यात पुरला. कोणाला संशय येऊ नये यासाठी आरोपी नवऱ्याने स्वत:च्या वडिलांना पोलीस स्थानकामध्ये पाठवून बायको बेपत्ता असल्याची तक्रार करायला लावली. पण पोलिसांच्या हुशारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बायकोचे नाव बबली, तर तिच्या आरोपी नवऱ्याचे नाव रजनीकांत असे आहे. सात वर्षांपर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. पण कालांतराने रजनीकांतला त्याच्या बायकोवर संशय येऊ लागला. बबली दुसऱ्या माणसाशी बोलत असल्याचे रजनीकांतला वाटत होते. या संशयापायी त्याने बबलीची हत्या केली.

घटनेच्या रात्री रजनीकांत आणि बबली यांच्यामध्ये वाद झाला. रागाच्या भरात रजनीकांतने त्याच्या बायकोवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने बबलीचा गळा चिरुन तिची हत्या केली. या घटनेच्या वेळेस रजनीकांतचे आईवडील काही कारणांमुळे बाहेर गेले होते, तर त्यांची मुलं घरात झोपली होती. कुणाला काही कळू नये यासीाठी रजनीकांतने बबलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला.

आईवडील परतल्यानंतर रजनीकांतने बबली बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. रजनीकांतच्या बोलण्यात पोलिसांना चुका आढळल्या होत्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कडक चौकशी केली. तेव्हा रजनीकांतने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. बायकोची हत्या करणे आणि तिचा मृतदेह लपवून ठेवणे यामुळे रजनीकांतला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घरकुल घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलंच चक्क आधारकार्ड, रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT