crime news Saam Tv
क्राईम

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Panvel News : पनवेलमध्ये सलग दोन दिवसांत दोन मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्या. कोपरखैरण्यातील टोळीयुद्धात दोन जण गंभीर जखमी झाले तर कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रेवर गोळीबार झाला.

Alisha Khedekar

  • पनवेलमध्ये सलग दोन दिवसांत गँगवॉर व गुन्हेगारी हल्ल्यांनी खळबळ

  • कोपरखैरणे सेक्टर १९ मधील हाणामारीत दोन जण गंभीर जखमी

  • कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रेवर खुटारी गावात गोळीबारासह हल्ला

  • पोलिसांची मोठी मोहीम, १५ जणांविरोधात गुन्हा दाखल, अनिकेत म्हात्रे फरार

पनवेल येथे शनिवारी पुण्यातील गँगवॉरची पुनरावृत्ती झाली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्यादिवशी कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये दोन टोळ्यांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारीने परिसर दणाणून गेला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने कारवाई करून दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला आणि सोमवारी तिघा संशयितांना अटक केली आहे.

ही घटना सराईत गुन्हेगार राजेश जेजुरकर आणि गोरख म्हात्रे यांच्या टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून उफाळून आली. दोन्ही टोळ्यांनी पूर्वतयारीतच शस्त्रसज्ज होऊन एकमेकांवर हल्ला केला. तलवार, कोयते यांचा वापर करून मारहाण करण्यात आली. यात राजेश जेजुरकर आणि आकाश नवघणे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेप्रकरणी गोरख म्हात्रे, राजेश जेजुरकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी हर्षद भोसले, गोरख म्हात्रे आणि राज राय यांना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान पनवेल परिसरात शनिवारी घडलेली आणखी एक गंभीर घटना चर्चेत आहे. एकेकाळी पनवेलमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रे याच्यावर त्याच्याच खुटारी गावातील अनिकेत म्हात्रे या तरुणाने हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. अनिकेत हा स्थानिक पातळीवर "गोल्डन मॅन" म्हणून परिचित आहे. तक्रारीनुसार, अनिकेतने राजकुमार म्हात्रे याला मारहाण करताना बंदूक काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या.

याशिवाय तलवार, बंदूक आणि हॉकी स्टिकसारख्या घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार म्हात्रेला पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी अनिकेत म्हात्रेसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्ल्यापासूनच अनिकेत म्हात्रे फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पनवेल पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. पनवेल मधील वाढती गुन्हेगारी पाहता संपूर्ण पनवेल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : उत्साहात दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT