Nanded Father Murder 7 year Daughter Saam Tv
क्राईम

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Nanded Crime News : नांदेडमध्ये एका निर्दयी बापाने ७ वर्षीय मुलीला कॅनॉलमध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडमध्ये जन्मदात्या बापाकडून ७ वर्षीय मुलीची हत्या

  • कॅनॉलमध्ये बुडवून निर्घृण हत्या

  • आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • आर्थिक तणावातून हत्या केल्याची प्राथमिक अंदाज

Nanded Father Murder 7 year Daughter नांदेडमध्ये वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ७ वर्षीय मुलीला तिच्या जन्मदात्या बापाने कॅनॉलमध्ये बुडवून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक अडचणीतून ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे घडली आहे. पांडुरंग कोंडामंगले असे आरोपीचे नाव असून त्याला दोन जुळ्या मुली आहेत. त्यातील एक मुलगी प्राची हिला पांडुरंग दुचाकी वरुन फिरण्याच्या बहाण्याने घेउन गेला. वाटेत तेलंगणा राज्यातील येडपल्ली येथील एका कॅनॉलमध्ये बुडवून निर्दयी पांडुरंगने प्राचीची हत्या केली.

या हत्येनंतर त्याने प्राचीला तिथेच सोडून दिले आणि घरी परतला. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने तपास सुरु केला. आणि आरोपी पांडुरंग कोंडामंगलेला या निर्दयी बापाच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, पांडुरंग हा आर्थिक अडचणीत असल्याने त्याने याच समस्येतून आपल्या पोटच्या एका मुलीची हत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नसून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. शिवाय आरोपीची पोलीस चौकशी सुरु असून लवकरच या हत्ये मागील कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

Office Wear Saree: ऑफिस लूकसाठी या 5 साड्या बेस्ट, तुमचा प्रोफेशनल लूक दिसेल भारी

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? महत्त्वाची माहिती आली समोर

Comedy Actor Death News : ज्येष्ठ विनोदी अभिनेत्रीचं ७१ व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT