Beed Crime News  Saam Tv
क्राईम

Beed Crime News : चल तुला नाश्ता देतो! बहाणा करून जवळ बोलवलं नंतर...; शिक्षणाधिकाऱ्याचे १६ वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य

Beed news : बीडच्या केज तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्यावर १६ वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक घटनेने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • बीडच्या केज तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्याचे १६ वर्षीय मुलीवर विनयभंग

  • निर्जनस्थळी नेऊन अतिप्रसंगाचा प्रयत्न करताच गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे मुलगी बचावली.

  • आरोपी लक्ष्मण बेडसकराविरुद्ध गुन्हा दाखल

  • पोलिसांचा तपास सुरू, कठोर कारवाईची मागणी.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याने १६ वर्षीय मुलीवर नाश्ता देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग केला आहे. बेडसरकर याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गाव हादरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी तिच्या मावशी व बहिणीसोबत होती. आरोपी बेडसकर याने त्यांना नाश्ता देण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत बसवले. मात्र, तो त्यांना एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिथे काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर याने तेथून पळ काढला.

या घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार केज पोलिसांनी बेडसकर याच्याविरुद्ध विनयभंगासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलींसाठी सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या एका शैक्षणिक अधिकाऱ्याने असे वर्तन केल्याने संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, आरोपी बेडसकर याच्या संदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही महिलांसोबत त्याने अश्लील संभाषण केल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे देखील उघड झाले आहे. यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच गडद झाला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी केज पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफी कधी होणार? दत्ता भरणेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेत थेट उत्तरच सांगितलं, म्हणाले...VIDEO

Aluchi Bhaji : पालक शेपू कशाला? अळूची गावरान भाजी एकदा नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: राजकारणात मला यायचं नव्हतं मुंडे साहेबांनी मला यात आणलं- पंकजा मुंडे

Fast Weight Loss: वजन कमी करायचं आहे? पण, हेवी डाईट नको; मग फॉलो करा या ६ सोप्या टिप्स

India Tourism: सोलनपासून हाकेच्या अतंरावर आहे स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, ठिकाण पाहून मंत्रमुग्ध व्हाल

SCROLL FOR NEXT