Bihar Crime News SAAM DIGITAL
क्राईम

Bihar Crime News: रिक्षाचं भाडं मागताच प्रवासी संतापले; ड्रायव्हरला बेदम मारहाण करत गोळीबार

Passengers Attack On Rickshaw Driver: बिहारमधील गुन्हेगारीचे सत्र काळानुसार वाढत चालले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Passengers Attack On Rickshaw Driver

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील गुन्हेगारीचे सत्र काळानुसार वाढत चालले आहे. यात कधी अपहरण तर कधी छोट्या गोष्टीवरून हत्या अशा घटना थांबण्याच नाव घेत नाहीयेत. अशातच बिहारमध्ये एका रिक्षा चालकानं प्रवाशाकडून भाडं मागितलं. त्यावेळी रिक्षाचालकाच्या पोटात आणि छातीवर गोळ्या झाडल्याची घटना घडलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिहारमधील जमुईतील एका रिक्षा चालकास प्रवासी भाडं मागणं हे जीवाशी बेतलं आहे. रिक्षा चालकानं प्रवासी भाडे मागितल्यामुळं रिक्षातील व्यक्तींनी पैशांऐवजी त्याच्या पोटात आणि छातीवर गोळ्या झाडल्या आहेत. यात रिक्षाचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही सर्व घटना मंगळवारी लछुआड पोलीस ठाणे परीसरात घडली.

या घटनेची माहिती लछुआड आणि सिकंदरा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी रिक्षा चालकास प्राथमिक उपचाराकरीता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षा चालकावर झालेले वार इतके गंभीर होते की पुढील उपचारासाठी त्याला पटनामधील रुग्णालयात पाठवण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रिक्षा चालक सिकंदरा येथील रहिवासी असून शंभू असं त्याचं नाव आहे. तो आपल्या ४ मित्रांसह रिक्षाने जाजल गावाकडे निघाला होता. सर्व प्रवासी जाजल वळणावर उतरले आणि भाडे न भरता निघू लागले.

रिक्षा चालकाने आरोपींकडे भाडं मागितलं असता सर्व तरुणांनी भाडं देण्यास नकार दिला. यानंतर त्यांच्यात भाड्यावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयितांनी रिक्षा चालकाच्या पोटात आणि छातीत एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवरकात लवकर आरोपींचा तपास करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सागितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

SCROLL FOR NEXT