Crime News Saam tv
क्राईम

Crime News: फुटबॉलमध्ये करिअर घडवून देतो म्हणत जाळ्यात ओढलं; नंतर ३ वर्ष अत्याचार अन्..., १७ वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य

Crime News: वसईतील एका खासगी फुटबॉल प्रशिक्षकाविरोधात १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: जगभरात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल या खेळाचा वर्ल्डकपची आजपासून सुरुवात होणार आहे. पण मुंबईत फुटबॉल विश्वात स्वत:चं नाव करु पाहणाऱ्यामुलीसोबत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. फुटबॉलमध्ये उज्ज्वल करिअर घडवून देण्याचे आश्वासन देत एका खासगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय मुलीचा वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकाविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

अभिजित मेंडल (वय ३६, रा. वसई) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो वसई परिसरात खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशिक्षकाने मुलीला फुटबॉल क्षेत्रात चांगल्या संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तिच्याशी विश्वास संपादन करुन तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केला असे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी त्याने मुलीचा अत्याचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, काही काळानंतर मुलीने प्रशिक्षकाशी संपर्क कमी केला. त्यानंतर आरोपीने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याने मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू करत प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला.

या प्रकरणी बलात्कार, धमकी देणे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT