Goa Crime News Saam tv
क्राईम

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Goa Crime News: गोव्यामध्ये दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली. या प्रकरण पोलिसांनी लिव्ह-इन पार्टनरला अटक केली. हात-पाय बांधून आणि चाकूने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • गोव्यात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली

  • लिव्ह-इन पार्टनर असलेल्या रशियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली

  • आरोपीने चौकशीत दोन महिलांच्या हत्येची कबुली दिली

  • हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे

गोव्यामध्ये दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला पोलिसांना रशियन महिला एलेना कस्थानोवाचा मृतदेह सापडला होता. या महिलेचे हात-पाय बांधलेले होते आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी रशियन महिलेच्या लिव्ह-इन पार्टनर अलेक्सी लिओनोव्हला अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने फक्त एलेनाची हत्या केली नाही तर आणखी एका रशियन महिलेची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सी लिओनोव्ह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा रशियाचा आहे आणि तो बऱ्याच काळापासून गोव्यात राहत होता. लिओनोव्हने एलेना कस्थानोवा आणि एलिना वानीवा या दोन महिलांची हत्या केली. पोलिस सध्या या दोन्ही हत्याकांडाचा तपास करत आहेत. दोन्ही महिलांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. दोघींचे हात-पाय बांधून त्यांच्या गळ्यावरून चाकू फिरवत हत्या करण्यात आली होती.

आरोपीने सुरूवातीला त्याची लिव्ह इन पार्टनर एलेनावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिचे हात-पाय बांधले आणि तिच्यावर चाकूने अनेक वेळा वार केले. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही. नंतर त्याने ऐलेनाचा गाळा चाकूने चिरला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अलेक्सी लिओनोव्ह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली.

अटकेनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. तेव्हा त्याने आणखी एका महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. तो स्वत: दुसऱ्या महिलेच्या मृतदेहापर्यंत पोलिसांना घेऊन गेला. या दोन्ही महिलांची त्याने हत्या का केली? या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोन्ही हत्याकांडाच्या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

Vetoba temple Konkan: भक्तांच्या हाकेला धावणारा देव वेतोबा; कोकणात कुठे आहे याचं मंदिर?

Crime News: बेडरूममध्ये पत्नीचे दोन परपुरुषांसोबत भलतेच चाळे सुरू, तेवढ्यात पती आला अन्...; जे घडलं त्यानं गाव हादरलं

Red Saree Contrast Blouse: लाल साडी नेसणं टाळताय? मग 'हे' कॉन्ट्रास्ट ब्लाउज करा ट्राय, तुम्हीच दिसाल उठून

Maharashtra Live News Update: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर.

SCROLL FOR NEXT