court orders ten years jail to the three youth in nagpur minor girl molestation case saam tv
क्राईम

विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, तीन युवकांना 20 वर्षे सश्रम कारावास

Minor Girl Case : शिक्षिकेने विद्यार्थ्यांनीला धीर देत तिच्या पालकांना सगळा प्रकार सांगितला. पालकांनी पाेलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur Crime News :

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तिघांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इम्रान शेख रहेमान शेख (वय १९), चिंटू रमेश पाटील (वय २५) आणि दिनेश पवार (वय २१) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 डिसेंबर 2016 रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पीडिता तिचा संगणकाचा क्लास संपून घरी परत जात होती. यावेळी तिच्यासोबत ४ वर्गमित्रही होते. रात्रीच्या संधीचा फायदा घेत आरोपींनी त्यांना अडविले. त्यानंतर तिच्या मित्रांना मारहाण केली.

मुलीला लगतच्या परिसरात नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एकेदिवशी तिने हा सगळा प्रकार शाळेतील एका शिक्षिकेला सांगितला.

शिक्षिकेने तिला धीर देत तिच्या पालकांना बाेलावून सगळा प्रकार सांगितला. पिडितेसमवेत पालकांनी पाेलिसांत धाव घेत घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तिघांवर गुन्हा नाेंदवित त्यांच्यावर कारवाई केली.

या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी तिन्ही नराधमांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड ठोठावला. पीडितेच्या पुनर्वसनासाठी आवश्यक मदत करावी असे निर्देशही न्यायालयाने दिलेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस का म्हणतात? वाचा सविस्तर...

Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

कोणत्या भाजीत मोहरी घालू नये

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन

SCROLL FOR NEXT