Chhattisgarh 2 Girls Rape News Saam Tv
क्राईम

Crime News : लग्नावरून परतताना रस्त्यात अडवलं, अपहरण करून दोघींवर ८ ते ९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात लग्न समारंभावरून परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर ८ ते ९ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Alisha Khedekar

  • छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात धक्कादायक घटना

  • लग्न समारंभावरून परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

  • आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • परिसरात भीतीचे वातावरण आहे.

छत्तीसगडमध्ये धक्कादायक घटना. सुरगुजा जिल्ह्यात लग्न समारंभ आटपून परत घरी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींवर ८ ते ९ जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी एकाच गावातील चार अल्पवयीन मुली जवळच्या वस्तीत एका लग्नसमारंभाला गेल्या होत्या. रात्री सुमारे १० वाजता त्या घरी परतत असताना, एका ठिकाणी ८ ते १० तरुणांनी त्यांना अडवले. काही जण सायकल तर काही दुचाकींवरून आले होते. सुरुवातीला त्यांनी मुलींचा विनयभंग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली.

या दरम्यान, एक मुलगी धाडसाने पळून जाण्यात यशस्वी झाली, तर दुसरीनेही प्रसंगावधान राखून निसटण्यास यश मिळवले. मात्र, उर्वरित दोन मुलींना आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेले. एका मुलीला गावापासून दूर असलेल्या मैदानात नेऊन चार जणांनी सामूहिक अत्याचार केला, तर दुसऱ्या मुलीवर गावातील परिसरातच तीन जणांनी अत्याचार केल्याची माहिती आहे.

पहाटे सुमारे २ वाजता दोन्ही पीडित मुली घरी परतल्या, मात्र भीतीमुळे त्यांनी कुटुंबीयांना काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी एका मुलीने आईसोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी प्रियांशु खालखो, आशिष, राहुल आणि इतरांविरुद्ध बीएनएसच्या कलम ७०(२) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४(२), ५(जी) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga water: गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही का?

Famous Influencer : सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन; Reel मधून पैसा अन् सोनं दाखवलं, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

SCROLL FOR NEXT