Chhattisgarh News Saam TV
क्राईम

Chhattisgarh News: पत्नीसोबत जबरस्तीने ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध; कोर्टाने उद्योगपतीला सुनावली थेट ९ वर्षांची शिक्षा

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील दुर्ग येथील भिलाई-दुर्ग टिवीनशहरातील एका उद्योगपतीला ९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी उद्योगपतीला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००७ मध्ये लग्नानंतर उद्योगपतीने पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले तसेच हुंड्यासाठी पत्नीचा छळ केला.

Bharat Jadhav

Chhattisgarh Businessman 9 years Rigorous Imprisonment :

छत्तीसगडमधील फास्ट ट्रॅक कोर्टाने एका जोडप्यातील वादाप्रकरणी मोठा निर्णय देताना एका उद्योगपतीला ९ वर्षाची शिक्षा सुनावलीय. या जोडप्यामध्ये शारिरिक संबंधावरून वाद हा निर्माण झाला होता. पतीने आपल्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पत्नी केली होती. याप्रकरणी निकाल देताना कोर्टाने उद्योगपतीला ९ वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. (Latest News)

शिक्षा झालेला उद्योगपती भिलाई-दुर्ग टिवीन शहरातील रहिवाशी आहे. कोर्टाने आपला निर्णय देताना आरोपी कलम ३७७ अंतर्गत दोषी ठरवत, पतीला कोणतीच सूट देता येणार नसल्याचं नमूद केलं.तसेच आरोपीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणीलादेखील १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

नवरा-बायको असताना शारीरिक संबंध राहतीलच ना असं अनेकजण म्हणतील. परंतु हे संबंध अनैसर्गिक असल्याने न्यायालयाने उद्योगपतीला शिक्षा सुनावलीय. फिर्यादीनुसार, २००७ मध्ये लग्नानंतर पतीने अनैसर्गिक संबंधांसह मानसिक आणि शारीरिक छळ केला. सुरुवात केली. तसेच हुंड्यासाठी आरोपी उद्योगपतीने पत्नीचा छळ केला होता.

पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आपल्या एकुलती एक मुलीला घेऊ सासरचं घर सोडलं. पुढे सिंगल मदर म्हणून मुलीचं पालन पोषण करायचं असं ठरवलं. त्यानंतर ही महिला २०१६ मध्ये तिच्या मुलीसह पालकांकडे माहेरी आली. त्यानंतर या पीडितेने ७ मे २०१६ रोजी सुपेला पोलीस स्टेशनमध्ये पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी अनैसर्गिक शारीरिक संबंधंचा कलम ३७७ आणि कलम ४९८ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

त्यानंतर हे प्रकरण कोर्टा पोहोचलं. या खटल्यावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटलं की, "गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता, आरोपी पतीला कोणत्याच प्रकारची सूट देता येणार नाही. हे न्यायिक ठरणार नाही. पतीचा गुन्हा हा आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत येतो, जो दंडनीय गुन्हा आहे. यामुळे आरोपी पतीला आयपीसी कलम ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे) अंतर्गत एक वर्षाची RI आणि १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दोन्ही शिक्षा ह्या एकाच वेळी चालू राहतील. त्याच आरोपाखाली त्याच्या आई-वडिलांनाही प्रत्येकी १० महिने तुरुंगवास ठोठवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT