Chhatrapati Sambhajinagar: Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: 'कुत्र्याला रस्त्यावर फिरवू नको', आईने अडवल्याचा राग, एकुलत्या एका मुलाने संपवलं आयुष्य; मन सुन्न करणारी घटना!

Chhatrapati Sambhajinagar Breaking News: आईने रागावल्यामुळे एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ८ जून २०२४

'पाळलेल्या कुत्र्याला मुख्य रस्त्यावर घेऊन जाऊ नको' एवढेच सांगितल्याचा राग आल्याने 14 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. राजवीर राहुल गडकर असे या मुलाचे नाव असून मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाळलेल्या कुत्र्याला रस्त्यावर घेऊन जाऊ नको एवढेच सांगितल्याचा राग आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजवीर राहुल गडकर असे या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोबाईलचे व्यसन सुटावे यासाठी नववीत शिकणाऱ्या राजवीरला काही महिन्यांपूर्वी त्याच्या कुटुंबाने कुत्रे घेऊन दिले होते. राजवीर हा रोज त्यांच्यासोबत खेळत होता. मात्र जेव्हा ते कुत्रे घेऊन राजवीर मुख्य रस्त्यावर गेला तेव्हा त्याच्या आईने आवाज देऊन कुत्र्याला रस्त्यावर घेऊन न जाण्यासाठी रागावली. त्याचाच राजवीरला राग आला आणि त्याने घरातील खोलीत जाऊन थेट गळफास घेत आपले जीवन संपवले.

दरम्यान, राजवीर हा जुबली पार्क येथील शाळेत शिकत होता. त्याचे वडील अंध असून आईला बेन्स्ट्रोक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. अशातच एकुलत्या एका मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT