Sambhajinagar friend killed the young man  Saam TV News
क्राईम

Crime News : 'तुझा भाऊ नाल्याजवळ पडलाय'; मित्रानेच केली २२ वर्षीय मित्राची हत्या, संभाजीनगर हादरलं

Chhatrapati Sambhajinagar Crime : सदर तरुणाची हत्या नशेच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच त्याची हत्या मित्रानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरातील कबीरनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशा केल्यानंतर झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राजन प्रल्हाद काकडे (वय २२, रा. कबीरनगर, गल्ली नंबर २) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सकाळी राजन काकडे घरातून बाहेर पडला. तो सेट्रिंगची कामे करतो. तो सकाळी बाहेर गेल्यानंतर दुपारी परिसरातील एकाने त्याचा भाऊ आशिष काकडे याला, 'तुझा भाऊ जखमी अवस्थेत नाल्याजवळील एका इमारतीच्या भागात पडलेला असल्याचं सांगितलं,' अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनला रेल्वे स्थानक एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेट क्रमांक ५३ जवळील एका जुन्या कंपनीच्या मागील बाजूला झाडाझुडपात कंपनीच्या भिंतीजवळ तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे आणि त्यांच्यासोबत अन्य पोलिस कर्मचारी अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले. न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी दाखल झाले. परिवारातील सदस्यांनी ओळख सांगितली. मृत तरूणाचे नाव राजन प्रल्हाद काकडे असल्याची माहिती मिळाली. सातारा पोलिसांसह सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

सदर तरुणाची हत्या नशेच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच त्याची हत्या मित्रानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या श्वान पथकाने घटनास्थळापासून राजन काकडे याच्या चपलांपर्यंतचा माग घेतला आणि त्यानंतर काही अंतरावर मारेकऱ्याची बाईक सापडली. पोलिसांनी सदर बाईक जप्त केली असून आरोपीला शोधण्यासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, या प्रकरणी मृत राजन प्रल्हाद काकडे याच्या भाऊ आशिष प्रल्हाद काकडे याच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT