Mumbai News Saam tv
क्राईम

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Chhatrapati Sambhajinagar Crime: प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात उलगडा केला असून पत्नीसह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ६ मे २०२४

पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी देत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात उलगडा केला असून पत्नीसह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या हडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराखे या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकुन खून करण्यात आल्याची घटना घडली होती. सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या खुनाचा उलगडा केलाय.या मध्ये आरोपी पत्नीसह इतर 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे पतीचा खून झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी पत्नी समोर येत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच पत्नीने खुनाची कबुली दिली. रूपाली गणेश दराखे असे सुपारी देण्याऱ्या पत्नीचे नाव असून सुपडू गायकवाड असे या मारेकरी प्रियकराचे नाव आहे. रूपालीने 2 लाख रुपयात नवऱ्याचा काटा काढण्याची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपास समोर आली आहे.

दरम्यान या प्रकरणी अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत चौथे यांना सिडको पोलिसांनी अटक करत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, याबाबत अधिक माहिती आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT