Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Shahaji Patil : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला होता त्यावेळी त्यांच्या सोबत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील होते. सूरत मार्गे गुवाहाटी गाठणाऱ्या ४० आमदारांमध्ये शहाजी बापू पाटील सर्वांत आधी चर्चेत आले होते.
Shahaji Patil
Shahaji Patilsaam tv

भरत नागरे

पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि सांगोल्याचे कट्टर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी आज मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर आमदार पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या जवळीकतेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेनेत आल्याचा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी जाहीर सभेत केला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला होता, त्यावेळी त्यांच्या सोबत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील होते. सूरत मार्गे गुवाहाटी गाठणाऱ्या ४० आमदारांमध्ये शहाजी बापू पाटील सर्वांत आधी चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार शहाजी बापू पाटील 'काय झाडी, काय डोंगर..' या आपल्या संवादामुळे अख्या राज्यभरात चर्चेत आले होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत, आता कारण ठरलंय त्यांचा शिवसेनेत येण्याच्या प्रवासामागील किस्सा. आपण शिवसेनेत कसे आलोत याचा किस्सा त्यांनी पंढरपुरातील एका सभेत सांगितला.

मी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिवसेनेची उमेदवारी घेतली असा मोठा गौप्यस्फोट पंढरपुरात केला. सांगोल्यात आपल्याला ११०० मते मिळाली होती. त्यानंतर २००४ ला १३००, त्यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणुकीतही ११०० मते मिळाली. त्यानंतर २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राजमार्ग दाखवला. भाजपचे तिकीट मिळत नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत जावे असं सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेची उमेदवारी घेतली. हे खरं आहे की नाही ते त्यांनीच सागांव असं आमदार पाटील या पंढरपूरच्या सभेत म्हणाले.

आपण शिवसेनेचं तिकीट घेतलं तेव्हा अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्या ठिकाणी फक्त ११००, १२०० मते मिळत होती, तेथे शिवसेनेचं तिकीट घेत आपण २०१४ च्या निवडणुकीत अवघ्या ४ महिन्यात ७६ हजार मते अधिक घेत विजय मिळवल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले.

Shahaji Patil
Maharashtra Politics: आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का! ९ पुतणे शरद पवार गटात प्रवेश करणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com