Chhatrapati Sambhajinagar Latest News Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: भयंकर घटना! पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १ मार्च २०२४

Chhatrapati Sambhajinagar Crime:

छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज एमआयडीसी परिसरात पतीने पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजीमधील दत्तनगर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सुनीता मदन बेडवाल (वय, 30) असे खून झलेल्या महिलेचे नाव असून मदन बाबुसिंग बेडवाल असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पती आणि पत्नी मध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून खून केलाय. मदनचे मूळ गाव ओझर जालना हे असून त्यांना एक 4 वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS News Update : मराठीला नाही म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप; पहा काय आहे प्रकार

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

SCROLL FOR NEXT