Chhatrapati Sambhajinagar : ३ मुलींची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, बाप गर्लफ्रेंडसोबत फरार

Chhatrapati Sambhajinagar News: तीन मुलींना सोडून आई प्रियकरासह, तर वडील प्रेयसीला घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा परिसरात घडली.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २९ फेब्रुवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तीन मुलींना सोडून आई प्रियकरासह, तर वडील प्रेयसीला घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा परिसरात घडली. आई- वडिल वाऱ्यावर सोडून गेल्याने तिनही मुली गेल्या अडीच महिन्यांपासून माय-बापाची वाट पाहत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील सातारा परिसरात एक जोडपे भाड्याने राहत होते. त्यांना तीन मुली असूनही पती- पत्नी दोघांचेही विवाहबाह्य संबंध सुरू होते. मात्र दोघेही एक दिवस घर सोडून आपापल्या प्रियकर आणि प्रेयसीकडे गेले.

त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आई-वडिलांच्या प्रतीक्षेत असलेले या लहान मुलींचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्यांच्या घरमालक आणि समाजसेवकांनी या मुलींचा सांभाळ केला. त्यानंतर बालकल्याण समितीला ही माहिती कळताच सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही आई-वडिलांना विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhatrapati Sambhajinagar News
Nandurbar News : दोन रेशन परवाने असूनही वितरण एकच ठिकाणी; हक्काच्या रेशनपासून अनेक लाभार्थी वंचित

या दोघांचेही मुलींकडे अनेकदा दुर्लक्ष असायचे. शिवाय नाहक मारहाण देखील हे मायबाप या मुलींना करायचे. आता डिसेंबर महिन्यापासून बेपत्ता झालेले मायबाप कधी परत येतील याची प्रतिक्षा अजूनही या तीन लहान मुली करतच आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणांमध्ये सातारा पोलीस अधिक तपास करत आहे. सध्या या मुली बालकल्याण समितीच्या आदेशाने छावणीच्या बालगृहात वास्तव्य करत आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar News
Shirpur News : ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच मागितल्याचा संशय; वाहनचालक, पंटरविरुद्ध गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com