Pune Crime News: तोतया GST अधिकाऱ्यांची छापेमारी; व्यावसायिकाकडून २ लाख पळवले, पुण्यात खळबळ

Pune Fake GST Raid News: या छापेमारीत तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाचे २ लाख रुपये लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. १ मार्च २०२४

Pune Crime News:

पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बनावट जीएसटी अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची घटना घटली. या छापेमारीत तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाचे २ लाख रुपये लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भुसार विभागात संबंधित सुपारी व्यावसायिकाचे दुकान आहे. दिनांक आठ फेब्रुवारी रोजी या दुकानावर पाच ते सहा तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

यावेळी या तोतया अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये मालाची आणि बिलांचे रेकॉर्ड मागवत मालाचा व्हिडिओ काढून चेकिंगच्या नावाखाली दबाव टाकला. तसेच तब्बल दोन लाख रुपये लंपास केले. ही घटना आठ फेब्रुवारी रोजी घडली मात्र गुन्हा २७ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार देण्यात आली.

Pune Crime News
Sambhaji Bhide: मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड, पाहा VIDEO

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये ६ बनावट जीएसटी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Palghar Crime News : माथेफिरूकडून दोन सख्ख्या भावांची हत्या; धक्कादायक घटनेनं पालघर हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com