Jalgaon Crime News Saam tv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar : शौचास बसण्याच्या कारणावरून वाद टोकाला गेला, तिघांकडून ६० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

Chhatrapati Sambhajinagar Crime news : छत्रपती संभाजीनगरमध्ये शौचास बसण्याच्या कारणावरून तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ६० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शौचास बसण्याच्या कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये शौचास बसण्याच्या कारणावरून तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केला. इथे बसू नको असं म्हटल्यानंतर राग अनावर होताच तिघांनी ६० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोळघर गावात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

इथे बसू नको, म्हटल्यावर तिघांनी ६० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गंभीर हल्ला केला. शौचास बसण्याच्या कारणावरून झालेल्या हल्ल्यात साठ वर्षीय कैलास साठे गंभीर जखमी झाले आहेत.जीवघेणा हल्ला प्रकरणी तिघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घराच्या मालकीच्या हक्कावरून बेदम मारहाण, 10 ते 12 गुंडाविरुद्ध गुन्हा नोंद

छत्रपती संभाजीनगरमधील केसर सिंग पुरा भागात काही गुंडांनी एका कुटुंबीयाला घराच्या मालकी हक्काच्या वादावरून बेदम मारहाण केली. घरातील वस्तू, साहित्य बाहेर काढताना विरोध केल्याने या गुंडांनी कुटुंबीयांतील सदस्यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात अज्ञात 10 ते 12 गुंडाविरुद्ध नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT