Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांच्या घरात चहा किंवा कॉफी पिण्यासाठी चिनी मातीचे कप वापरले जातात. बाजारात वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्स आणि रंगांमध्ये हे कप उपलब्ध असतात.
बाजारातून सुंदर कप किंवा सेट घरी आणला की आपण वर्षोनवर्षे तोच वापरतो, पण तुम्हाला माहितीये का? चहा- कॉफी पिणयासाठी तुम्ही ज्या चिनी मातीच्या कपमध्ये रोज चहा पिता, त्या कपांचीही एक्सपायरी डेट म्हणजे मर्यादा असते.
जुने किंवा खराब झालेले कप आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, यासाठी कप कधी बदलले पाहिजेत, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कपाचे हँडल किंवा कडा तुटलेली असेल, तर ते कप वापरणे टाळा. अशा कपांमध्ये गरम चहा किंवा दूध ओतल्यास कप तडकून फुटू शकतो.
सतत चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे कपांच्या आत काळपट किंवा पिवळसर डाग पडतात, जे सहसा साध्या साबणाने जात नाहीत. अशावेळी ते कप वापरणे तुम्ही टाळले पाहिजे.
तुम्ही वापर असलेले कप दिसायला अतिशय मजबूत आणि वर्षोनवर्षे टिकणारे वाटत असले, तरी निरोगी आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नाही.
निरोगी आरोग्यासाठी दर ६ महिन्यांनी किंवा वर्षभरात जुने कप बदलून नवीन कप वापरणे योग्य मानले जाते.
येथे दिलेली महिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.