Chhatrapati Sambhaji Nagar Saam TV
क्राईम

Chhatrapati Sambhaji Nagar : वाळुज एमआयडीसी परिसरात गुन्हेगारांचा सुळसुळाट; एका तरुणाची निर्घृण हत्या तर दुसरा गंभीर जखमी

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये पुन्हा एकदा एका 35 वर्षीय युवकाचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. तर अन्य एक जण येथे गंभीर जखमी आहे.

Ruchika Jadhav

रामू ढाकणे

Crime News :

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या खूनाची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अशीच भयंकर घटना समोर आली आहे. वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये पुन्हा एकदा एका 35 वर्षीय युवकाचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. तर अन्य एक जण येथे गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे समजले आहे.

राजू मुरकुटे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर देवरे असे जखमीचे नाव आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी याच परिसरात एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. या घटनेमुळे वाळूज एमआयडीसी परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीय.

नेमकं काय घडलं?

पोलीस तपासात समोर आलेल्या महितीनुसार, दोघेही तरुण एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाळुज एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले की नाही असा सवाल जनसामान्य जनतेतून उपस्थित होतोय. छत्रपती संभाजीनगरमधील कायदा सुव्यवस्था धाब्यावर असल्याचं समोर आलं असून एका आठवड्यात वाळूज औद्योगिक परिसरातील साजापुरमध्ये दुसरा खून झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT