Crime News Saam Tv
क्राईम

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं! भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या

Chandrapur Firing News : चंद्रपुरात भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरात भर चौकात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपुरातील गजबजलेल्या चौकात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शिवज्योतसिंग देओल असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने राजुरा परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील राजुरा येथे गजबजलेल्या चौकात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शिवज्योतसिंग देओल असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी मृतकाच्या लहान भावाने याच राजुरा शहरात गोळीबार केला होता. या गोळीबारात निष्पाप महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज त्याच्या मोठ्या भावाला भरचौकात गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

शिवज्योतसिंग हा वडिलांना भेटून कर्नल चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून मारेकरी पाठलाग करत आले. दुचाकीवरील व्यक्ती आपल्याला मारणार याची चाहूल लागताच शिवज्योतसिंग एका दुकानात घुसला. त्यानंतर मारेकऱ्यांनी दुकानात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिवज्योतसिंगचा जागीच मृत्यू झाला.

गोळीबाराच्या घटनेमुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबाराची ही घटना लोकांच्या समोरच घडल्याने चौकात मोठी गर्दी उसळली. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत गर्दी पांगवली. या मृत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी श्वान पथकही बोलावण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT