राजस्थानमधील प्रसिद्ध हनुमानगड जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटन समोर आली आहे. जिथे एक भरधाव कार कालव्यात पडल्याने वडील ,मुलगा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. राठीखेडा येथील हे रहिवासी इमाम मरगूब आलम हे रहिवासी आपल्या मुलाला कार चालवण्यास शिकवत होते शिवाय त्यांच्यासोबत पाच वर्षाचा नातूही होता. मात्र दरम्यान कारवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याकडील असलेल्या कालव्यात पडली. अपघातात कारच्या खिडकीच्या काचा उघडू न शकल्याने तिंघाचाही कारमध्या गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.
संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी (incident)दाखल झाले. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर तिंघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
हनुमानगड जिल्ह्यातील राठीखेडा येथील (वय६०) वर्षीय मरगूब आलम आणि सानिब हुसेन आणि ५ वर्षीय हसनैन अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांचे पथक आणि एसडीआरएफ टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने सुमारे तीन तासापेक्षा जास्त प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मिडिया रिपोर्टनुसार, स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ(Video) बनवत होतो मग त्यानंतर अचानक कार रस्त्याकडील कालव्यात पडली.
कारण काय ?
सदर अपघाताची माहिती मिळताच, तेथील तहसीलदार आणि डीएसपी आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि झालेल्या अपघाताचा तपास सुरु केला. एएसआय हंसराज यांनी सांगितले की, इमाम मरगूब हे आपल्या मुलाला कार चालवायला शिकवत होते. साधारण सकाळी आठच्या सुमारास अपघात परिसरात पोहचले त्यानंतर तेथे पोहचल्यानंतर व्हिडिओ बनवण्यास लागले. या दरम्यान कारचे (Car)नियंत्रण सुटून भरधाव वेगात असलेली कार कालव्यात पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.