crime news marathi  Saam tv
क्राईम

Crime News : फक्त ४०० रूपयांसाठी संपवलं, ५ मित्रांनी मिळून चाकूने सपासप वार करत जीव घेतला

Cab driver murder Crime News : दिल्ली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. फक्त ४०० रूपयांसाठी ५ जणांनी मिळून कॅब चालकाची हत्या केली.

Namdeo Kumbhar

Cab driver murder in Sonia Vihar : दिल्लीमधील सोनिया विहार परिसरात ४०० रूपयांसाठी कॅब चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच जणांनी मिळून मध्यरात्री कॅब चालकाची चाकूने सपासप हल्ला करत हत्या केली.पोलिसांनी यामधील एकाला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झालेय. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीने मित्रांना सोबत घेत कॅब चालकाचा काटा काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजधानी दिल्लीमधील सोनिया विहार परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. कारच्या 400 रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या भांडणानंतर ५ जणांनी मिळून 26 वर्षीय कॅब चालकाचा जीव घेतला. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडोसाठी टॅक्सी चालवणारा संदीप सोनिया विहारमधील पुस्ताजवळ रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी त्याचं निधन झाले.

आरोपींने ४०० रूपयांसाठी जीव घेतला -

मृत्यूपूर्वी संदीपने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. त्याने पोलिसांना सांगितले की, नोएडामधूल तो दीपांशू उर्फ ​​आशु, राहुल आणि मयंक या तीन प्रवाशांना घेऊन आला होता. सोनिया विहारमधील पुस्ता 2 येथे पोहोचल्यानंतर संदीपने त्यांच्याकडे ४०० रूपये भाडे मागितले. त्यावेळी त्यांनी वाद सुरू केला. त्यांना ४०० रूपये भाडे द्यायचं नव्हते. त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर त्यांनी आणखी मित्रांना बोलवून माझ्यावर चाकू हल्ला केला.

उपचारावेळी निधन -

सोनिया विहारमध्ये रात्री कॅब चालक संदीप याच्यावर ५ जणांनी जीवघेणा हल्ला केला. निखिल आणि अल्पवयीन एका मुलाने आधी संदीपच्या डोक्यावर मारले. त्यानंतर पोटात चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात संदीपला पाहताच आरोपींनी पळ काळला. संदीप याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्याचे निधन झाले.

आरोपीला ४८ तासांच्या आत बेड्या, तपास सुरू

पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच कारवाई सुरू केली. आजाबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपांचा शोध घेतला. प्रतिक नावाच्या मुलाने कॅब बूक केल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलीस याप्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. फरार ४ आरोपांचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT