Buldhana Crime News Saam TV
क्राईम

Buldhana Crime News : देह व्यापाराच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; हनीट्रॅपमध्ये अडकेलेल्या तरुणाला ६ लाखांचा गंडा

Honey Trap Crime News : सायबर पोलिसांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि चंदीगडपर्यंत पोहोचले. शेवटी आरोपी जयपूर- अंबाला रोडवरुन जात असल्याचे मोबाईल लोकेशन द्वारे कळाले.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldana:

ऑनलाइन पद्धतीने देहव्यापारसाठी वेबसाईट बनवून मुली आणि महिला पुरविण्याच्या नावावर लोकांना फसविण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहरात घडली. या प्रकरणी एका तरुणाला जवळपास ६ लाख रुपयांनी फसविण्यात आले आहे.

ही बाब सदर व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांच्या एका पथकाने ३ दिवसात जवळपास ५ हजार किलोमीटरचा प्रवास करून राजस्थानमधून ५ आरोपींना अटक केली आहे.

सायबर पोलिसांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि चंदीगडपर्यंत पोहोचले. शेवटी आरोपी जयपूर- अंबाला रोडवरुन जात असल्याचे मोबाईल लोकेशन द्वारे कळाले. त्यानंतर पथकाने आरोपींचा आपल्या कारने पाठलाग सुरू केला.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील कोटा जिल्ह्यातील मंडाना, राजस्थान येथे आरोपींना सिनेस्टाईल ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि कार असा एकूण ७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

हनीट्रॅपमध्ये नागरिकांना गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याच्या आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टींमध्ये गुंतू नये. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.

मुंबईसह पुण्यातून अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. अशात आता बुलढाण्यात देखील अशी घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT