Buldhana Crime News Saam Digital
क्राईम

Buldhana Crime: बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट; आधी हार्डवेअरच्या दुकानात डल्ला, मग शेतातली तूर पळवली

Buldhana News: तालुक्यातील डोणगावमध्ये एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १२ फेब्रुवारी २०२४

Buldhana Crime:

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यातील डोणगावमध्ये एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहकर (Mehkar) तालुक्यातील डोणगाव येथे चोरटे सक्रिय झाले आहेत. डोणगाव येथे चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शेतातील सोंगून ठेवलेली तूर ठोकून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, तर आलेगावकर यांच्या हार्डवेअरमध्येही चोरी झाली.

आरेगाव रोडवरील आलेगावकर यांच्या हार्डवेअरवरमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. मागील दरवाजाचे कुलूप तोडून गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये चोरून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, चोरटा सुमारे एक तास हार्डवेअरमध्ये टॉर्च घेऊन पाहणी करत होता. मात्र, त्याच्या हाती फक्त चिल्लरच लागल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. तर जवळा रोडवर अर्जुनराव बाजड यांच्या शेतातील सोंगून ठेवलेली तूर बडवून नेली. ही तूर २ पोती होती. सदर घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्या, जालन्यात मराठा महासंघाची मागणी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT