Buldhana Crime News Saam Tv
क्राईम

Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे.

Rohini Gudaghe

संजय जाधव, साम टिव्ही बुलडाणा प्रतिनिधी

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी (Buldhana Crime) झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली (Crime News) आहे. ग्राम सातगाव भुसारी येथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला होता. हा वाद शिगेला पोहोचला अन् त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुण जखमी झाले आहेत. रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळाली.

त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव (Two Group Dispute) घेतली. बुलढाणा, चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री दोन्ही गटातील १८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Buldhana Crime News) दिली आहे.

चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी या गावातील दोन गटात मागील काही दिवसांपासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री (२७ एप्रिल) दोन्ही गट आसमोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांना एकमेकांना जबर (Fight In Two Group) मारहाण केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

या घटनेची माहिती रायपूर पोलिसांनी (Raipur Police Station Area) जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. त्यांनतर त्यांनी दंगाकाबू पथक पाठविले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी या घटनेतील १८ आरोपीना अटक केली असून गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Dnyanada Ramtirthkar : लगीन घटिका समीप आली! ज्ञानदाचा होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिला PHOTO; थाटात पार पडला साखरपुडा

Rava Kesari Recipe: साऊथ इंडियन स्टाईल रवा केसरी हलवा कसा बनवायचा?

Street style sev puri chutney: शेवपुरीची स्ट्रीट स्टाईल चटपटीत आंबट गोड चटणी घरच्या घरी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ४० लाख लाडक्या बहिणींचा अपात्र होणार? ₹१५०० कायमचे बंद; तुमचं नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT