Scene of the tragic double murder in Mehkar where a husband killed his wife and 4-year-old son at home. Saam tv
क्राईम

संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सुखी संसाराची राखरांगोळी झाली, बायकोसह ४ वर्षाच्या चिमुकल्याचा घेतला जीव

Domestic Violence Leads To Child And Wife Death: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये भयंकर दुहेरी हत्या; पतीने पत्नी व चार वर्षाच्या मुलाचा घरातच कुऱ्हाडीने वार करून केला खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून हादरवून टाकणारी दुहेरी हत्या समोर आली आहे. एका निर्दयी पतीने त्याच्या पत्नीवर चारित्राच्या संशयावरून तिची हत्या केली आहे आणि हा नराधम इथेच न थांबता त्याने आपल्या मुलाचा देखील जीव घेतला आहे. स्वतःच्या घरातच त्याने पत्नी आणि चार वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केली आहे.

शिक्षक कॉलनीतील राहणारा राहुल हरीभाऊ म्हस्के (वय 33) या व्यक्तीने पत्नी रूपाली म्हस्के आणि चार वर्षीय मुलगा रेहांश म्हस्के यांची घरातच कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती भास्कर शंकर वानखेडे (वय 55, मोळा, तालुका मेहकर) यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, सध्या त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. सदर हत्याकांड कौटुंबिक वादातून उभा राहिल्याचे आणि पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या भयंकर हल्ल्यात मुलगी आणि नातू गंभीर जखमी झाले असले तरी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून संपूर्ण परिसरात ही घटना खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणामुळे संशयातून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई महापालिकेसाठी 'पॉवर पॅटर्न'? काका-पुतण्याने टाकला नवा डाव

गौतमी पाटील निवडणूक लढवणार? गौतमी पाटील होणार नगरसेविका?

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

SCROLL FOR NEXT