Buldhana Crime Saam tv
क्राईम

Buldhana Crime: शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद, दोन गटात तुफान हाणामारी; ४ जण जखमी

Buldhana Breaking News: शेतात जाण्याच्या रस्त्यावरुन झालेल्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना बुलढाण्यात घडली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २ जून २०२४

शेतात जाण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. या मारहाणीत चार जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतात जाण्याच्या रस्त्यावरुन दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या माळवंडी येथे घडली. शेतातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने इतरांना मज्जावं केल्याने दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाचे भांडणात पुनर्वसन होऊन तुफान हाणामारी झाली.

या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, धाड पोलिसांनी मात्र याबाबतची तक्रार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वाशिमच्या अटकळी येथे विजेचा शॉक लागून तीन बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. महावितरणला वारंवार तक्रारी देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरीव आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT