kalyan crime Saam Tv
क्राईम

Crime News : जमिनीच्या वादातून KDMC कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंडाचा हात असल्याचा संशय, एकाला अटक

Kalyan Crime : कल्याण चिंचपाडा परिसरात जमिनीच्या वादातून केडीएमसी कर्मचारी दिपक म्हात्रे यांच्यावर सहा हल्लेखोरांनी कोयते आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगारचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण चिंचपाडा परिसरात जमिनीच्या वादातून केडीएमसी कर्मचारीवर प्राणघातक हल्ला.

  • सहा हल्लेखोरांनी कोयते आणि तलवारीने वार केले.

  • कुख्यात गुन्हेगार अप्प्या दांडेचा सहभाग असल्याचा संशय

  • या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

  • पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.

कल्याण मध्ये चिंचपाडा परिसरात जमिनीच्या वादातून एक व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिपक म्हात्रे असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते केडीएमसी कर्मचारी आहेत. या हल्ल्यामागे कुख्यात गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून बाकी गुन्हेगार फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मध्ये चिंचपाडा परिसरात केडीएमसी कर्मचारी दिपक म्हात्रे यांच्यावर हल्ला करण्यात आला. सहा हल्लेखोरांनी कोयता आणि तलवारीने दिपक म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला जमिनीच्या वादातून सुपारी देऊन घडवून आणल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या प्रकरणात बदलापूरमधील गोळीबार प्रकरणात फरार असलेला कुख्यात गुन्हेगार अप्प्या दांडे थेट सामील असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेचा संपूर्ण कट सीसीटीव्हीत कैद झालं असून याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र अप्प्या दांडे आणि त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत. तर हल्ल्यात जखमी असलेल्या दिपक म्हात्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र दिपक म्हात्रे यांच्यावर का हल्ला करण्यात आला? हे अद्यापही स्पष्ट झाले नसून त्यांच्या हल्लेखोरांना कोणती शिक्षा केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT