Brother and sister brutally beaten up in Bhavani Peth Saam Tv News
क्राईम

Pune Crime News : दगड मारला, गाडी फोडली; हॉर्न वाजवल्याच्या कारणाने पुण्यात बहीण-भावाला बेदम मारहाण

Brother and Sister Beaten up for Honking in Pune : पुण्यातील बहीण भावाला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

पुणे : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होत आहे. त्यातल्या त्यात पुण्यात देखील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात डोकं वर काढत आहे. याचदरम्यान, शहरातील भवानी पेठेत बहीण भावाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हाणामारीत तिघे जखमी झल्याची माहिती आहे तर, खडक पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पुण्यातील मुळशी धरणात बुडून एका तरूणाचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत तो पोहण्यासाठी गेला होता, त्यावेळी तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा संतोष सोळंके (वय २४ वर्ष ,रा.पिंपळे सौदागर) असं बुडून मयत झालेल्‍या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी सुमित सुनिल लांडे (वय २४, रा. केशव नगर, मुंडवा, पुणे) यांनी पौड पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा, सुमित आणि त्यांचे काही मित्र रविवारी सकाळी फिरण्यासाठी मुळशी धरण परिसरात गेले होते. त्यावेळी पळसे येथील जलाशयात पोहण्यासाठी मित्र उतरले. पोहोताना कृष्णाला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडाला.

घटनास्थळाजवळच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) टीम सराव करत होती. एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून कृष्णाला पाण्याबाहेर काढले आणि त्याला सीपीआर दिला. मात्र, त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला तातडीने पौड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT