Bomb Threat Saam TV
क्राईम

Bomb Threat : अकरा विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पुणे विमानतळावरील प्रवाशांमध्ये घबराट

Bomb Threat in Flight : पुण्यात विमानतळावरून विविध दिशेने गेलेली ११ विमाने बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Ruchika Jadhav

पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेली 11 विमाने बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरुन एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत विमाने उडून देऊ, अशी धमकी देण्यात आलीये. या धमकीमुळे पुणे एअरपोर्टवरील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या या कंपनी मॅनेजरला एक मेल आणि ट्विट आलं आहे. ट्विटमध्ये आरोपीने पुण्यावरून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत अशी धमकी देऊन एअरपोर्टवर भीती निर्माण केली आहे.

ही विमाने दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या देशात निघाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केली असून आरोपींचा शोध धेण्याचे काम सुरू आहे.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी या आधी देखील एका विमानाला देण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात १७ ऑक्टोबर रोजी फ्रँकफ्रूटवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देखील सोशल मीडियावरून देण्यात आली होती.

मुंबई विमानतळावर या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र त्यावेळी विमानात काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kantara Chapter 1: 'कांतारा: चॅप्टर 1'मध्ये हृतिकची खास भूमिका; या दिवशी येतोय चित्रपटाचा ट्रेलर

Maharashtra Live News Update: - ओला दुष्काळ जाहीर करा, उबाठाने केली मागणी..

GK : कोणत्या देशात पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे? जाणून घ्या

Vijaydurg Fort History: गुप्त बोगदे, भक्कम तटबंदी..., जाणून घ्या विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेने २०० कोटींची निधी वळवला, पुण्यातील तब्बल ८०० कामे रखडली

SCROLL FOR NEXT