BJP Leader Ganesh Bidkar Yandex
क्राईम

Pune Breaking: '२५ लाखांची खंडणी द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू'; पुण्यात भाजप नेत्याला धमकीचा फोन

BJP Leader Threatening Call For Extortion: पुण्यामध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी फोन आला आहे. भाजप नेते गणेश बिडकर (BJP Leader Ganesh Bidkar) यांना धमकीचा फोन आल्याची मिळतेय. फोनमधून त्यांना 'खंडणी द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू' अशी धमकी देण्यात आली आहे. भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडून अज्ञात व्यक्तीने २५ लाख रूपये मागितले आहेत. दिवसेंदिवस खंडणी मागण्याचे प्रकार वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. या फोनमध्ये व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. यानंतर भाजप नेते गणेश बिडकर यांनी पोलिसांत (BJP Leader Threatening Call For Extortion) तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास सुरू आहे. मागील वर्षी देखील त्यांना धमकी देण्यात आली होती.

पुण्यामध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना हा धमकीचा फोन आल्यामुळे मोठी खळबळ उडाली (Pune News) आहे. याप्रकरणी बिडकर यांनी गुन्हा नोंद केली आहे. बिडकर यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी झाल्यामुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे पोलीस या खंडणी प्रकरणी तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून बिडकर यांच्याकडे खंडणीची (Extortion) मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास त्यांना राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या फोनद्वारे त्यांना मिळाली आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारची धमकी त्यांना मिळाली होती. तेव्हा देखील २५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Success Story: लहानपणीचं स्वप्न पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS केशव कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

Summer Skin Care: कडक उन्हातही टॅनिंग होणार नाही! फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

Ashok Kharat Case: अनामिका बोट का कापलं? २ सप्टेंबरच्या फोटोचं सत्य काय? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT