Crime News Saam Tv
क्राईम

Bihar Crime News: दोन बहिणींसह ४ मैत्रिणींचा आत्महत्येचा प्रयत्न; दोघींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर

Crime: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन बहिणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोघींचा मृत्यू झाला असून दोघींवर गया येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News :

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन बहिणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोघींचा मृत्यू झाला असून दोघींवर गया येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नैराश्येतून दोन बहिणींने घरातच विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट त्यांच्या मैत्रिणींना कळताच त्यांनीही विष प्राशन केले. घरातच हा सर्व प्रकार घडल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यानंतर चोघींचीही प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्यांना औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले, असं पोलिसांनी सांगितले. रविवारी रुग्णालयात जात असतानाच वाटेतच दोघींपैकी एका बहिणीचा मृत्यू झाला. तर सोमवारी दुसऱ्या एका मैत्रिणीचा मृत्यू झाला. मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय याबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही.

याबात औरंगाबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहम्मद अमानुल्ला खान यांनी सविस्तर माहिती दिली. मृत तरुणींच्या कुटुंबियांची चौकशी केली जात आहे. त्यांनी हे गंभीर पाऊल का उचलेले याचे कारण शोधण्यासाठी आम्ही या तरुणींची प्रकृती सुधारण्याची आम्ही वाट पाहत आहोत. सध्या या मुली काही बोलण्याच्या अवस्थेत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

एमबीए विद्यार्थ्याने केली मित्राची गळा चिरुन हत्या

क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्रावर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना तामिळनाडूतील करुर येथ समोर आली आहे. पी नितीश कुमार (वय २०) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ए अन्नमलाई असे आरोपीचे नाव आहे. दोघेही एमबीएचं शिक्षण घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रोज एकाच बसमधून प्रवास करायचे. तेव्हा त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. मात्र कुमारने काही कारणाने अण्णामलाईशी बोलणे बंद केले. त्यानंतर सोमवारी अण्णामलाई थोटियम येथे बसमध्ये चढला. त्यानंतर नितिश कुमार मुसिरी येथे बसमध्ये चढला. अण्णामलाई कुमारच्या जागेवर गेला आणि खिशातून चाकून काढून नितिशच्या गळ्याला लावला. त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादात नितीश जखमी झाला.

या संपूर्ण घटनेनंतर बस चालकाने नितीशला सरकारी रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अण्णामलाईविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT