Solapur Accident News: कार- बस अपघातात साेलापूर पाेलीस दलातील अधिकाऱ्यासह सहा जखमी

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
six injured in bus car accident at barshi solapur road near saundare
six injured in bus car accident at barshi solapur road near saundaresaam tv
Published On

Solapur News :

सोलापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास कार आणि बस मध्ये झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती समाेर आली आहे. हा अपघात बार्शी-सोलापूर रस्त्यावरील सौंदरे गावाजवळ झाल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : सोलापूरहून बार्शीच्या दिशेने कार निघाली हाेती. बार्शीकडून सोलापूरच्या दिशेने बस चालली हाेती. सौंदरे गावाजवळ या दाेन वाहनांत अपघात झाला.

six injured in bus car accident at barshi solapur road near saundare
Chandrapur : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्याचे वनपथक घटनास्थळी दाखल

या अपघातामध्ये कारमधील साेलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकाऱ्यासह चौघे तर बसमधील महिला वाहक आणि एक प्रवासी असे सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बसच्या समोरच्या भागातील काचा फुटल्या आहेत. दरम्यान जखमींना बार्शीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

six injured in bus car accident at barshi solapur road near saundare
Ravikant Tupkar: शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर मंत्रालयात मंत्री अंडी उबवायला बसलेत का? रविकांत तुपकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com