Chandrapur : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्याचे वनपथक घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती कळताच वन अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
speeding train knocks tiger dead on rail track near kitali mendha
speeding train knocks tiger dead on rail track near kitali mendhaSaamtv
Published On

Chandrapur News:

चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी मेंन्ढा येथे रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातील या घटनेने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हा संपूर्ण मार्ग जंगलातून जात असल्याने गाडीची गती कमी ठेवण्याबाबत वनविभागाच्या सूचना आहेत. मात्र त्या कसोशीने पाळल्या जात नसल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

दक्षिण पूर्वमध्य रेल्वेच्या वरिष्ठांचा १ डिसेंबरला गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा आहे. त्या संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी नागपूर डिव्हीजनचे वरिष्ठ अधिकारी आज (साेमवार) दौरा करणार होते. ही पाहणी चांदाफोर्ट - नागभीड- गोंदिया रेल्वे मार्गावर होती.

speeding train knocks tiger dead on rail track near kitali mendha
Kokan Poltitics: चर्चा तर हाेणारच! 'ओम गणेश' वर दीपक केसरकर; तब्बल 12 वर्षानंतर नारायण राणेंची घेतली भेट

रेल्वे अधिकारी यांना घेण्यासाठी गोंदियावरुन चांदाफोर्टसाठी निघालेल्या स्पेशल गाडीने नागभिड - तळोधी दरम्यान किटाळी- मेंढाजवळ रात्रीच्या सुमारास वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई केली जात आहे. या आधीही या मार्गावर वाघ व बिबटे रेल्वेच्या धडकेने ठार झाले आहेत. हा संपूर्ण मार्ग जंगलातून जात असल्याने गाडीची गती कमी ठेवण्याबाबत वनविभागाच्या सूचना आहेत. मात्र त्या कसोशीने पाळल्या जात नसल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

speeding train knocks tiger dead on rail track near kitali mendha
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com